शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लवकरात लवकर कर्जमाफी द्या -शिवसेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:25 IST

कोल्हापूर : शेतकºयांना लवकरात लवकर कर्जमाफी न दिल्यास भाजपच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा शिवसेनेच्यावतीने सोमवारी दिला.

ठळक मुद्दे: अन्यथा भाजपच्या मंत्र्यांना सळो की पळो करूमुख्यमंत्र्यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्याचे बोगसप्रमाणपत्रांसह

कोल्हापूर : शेतकºयांना लवकरात लवकर कर्जमाफी न दिल्यास भाजपच्या मंत्र्यांना सळो की पळो करून सोडू, असा इशारा शिवसेनेच्यावतीने सोमवारी दिला. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर निदर्शने करत फसवी कर्जमाफी केल्याच्या निषेधार्थ प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांची पूजा करून निषेध करण्यात आला.

दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक न्यू शाहूपुरीतील जिल्हा निबंधक कार्यालयासमोर एकवटले. काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची वेशभूषा केलेल्या कार्यकर्त्याचे बोगसप्रमाणपत्रांसह चारचाकी वाहनातून आगमन झाले. सर्वांना अभिवादन करतच ते आंदोलनस्थळी आले. हुबेहुब मुख्यमंत्र्यांसारखा दिसणाºया या कार्यकर्त्याने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांची महिला शिवसैनिकांनी फुले उधळून व आरती ओवाळून पूजा करत अनोखे आंदोलन करून निषेध नोंदविला.

यानंतर या प्रतीकात्मक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकºयांना बोगस प्रमाणपत्रांचे वाटप केले. मुख्यमंत्री बोगस असून त्यांनी कर्जमाफीची बोगस प्रमाणपत्रे देऊन शेतकºयांची फसवणूक केली आहे. त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध आहे, अशा शब्दांत संजय पवार, विजय देवणे व मुरलीधर जाधव यांनी समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांसह सरकार विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकाºयांना बाहेर बोलविले. त्यानुसार सहाय्यक निबंधक अमित गराडे आंदोलनस्थळी आले. या ठिकाणी त्यांच्यावर कर्जमाफीची स्थिती काय? किती लोकांना कर्जमाफी दिली? अशा प्रश्नांची सरबत्ती करून जाब विचारला. गराडे यांनी लाभार्थ्यांची यादी उपलब्ध झाली असून, त्याची पडताळणी करून संबंधितांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. यावर सरकारने चुकीचे आकडे देऊन दिशाभूल केल्याचा आरोप करत देवणे यांनी कर्जमाफीबद्दल सरकार फसव्या आकड्यांचा खेळ करत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात आॅनलाईन फॉर्म न भरलेल्या शेतकºयांचे आॅफलाईन फॉर्म मुदतवाढ देऊन भरून घ्यावेत. आधारकार्ड नसणारे १२ हजार शेतकºयांचे अर्ज आधारकार्डशिवाय मंजूर करावेत. महाराष्टÑ शासनाचे निकष व त्याची छाननी यातून तांबडा, निळा, पिवळा पट्टा हे निकष त्वरित रद्द करावेत, आदी मागण्या निवेदनांतून करण्यात आल्या आहेत.आंदोलनात सुजित चव्हाण, रवी चौगुले, शिवाजी जाधव, शशी बीडकर, संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, नामदेव गिरी, महादेव गौड, बाजीराव पाटील, शैलेश पुणेकर, शुभांगी पोवार, शांता जाधव, मेघणा पेडणेकर, सुजाता सोहणी, रणजित आयरेकर, आदी सहभागी झाले होते.महसूलमंत्र्यांचे विधान धक्कादायकशेतकºयांनी कर्ज भरले नाही, तर सरकार कर्जबाजारी होईल, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी औरंगाबाद येथे केले आहे. ज्यांना सरकार चालवायला दिले त्यांच्याकडूनच असे विधान येत असेल, तर ते धक्कादायक आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे देवणेयांनी सांगितले.

टॅग्स :StrikeसंपPoliticsराजकारण